पोस्ट्स

ऑगस्ट २४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत आणि जपानमधील आडनावाचे टप्पे

  भारत आणि जपानमधील आडनावाचे टप्पे  विश्वकोशातील व्याख्येनुसार आडनाव शब्दाचा अर्थ उपनाम किंवा अधिकनाम असून त्याची उत्पत्ति अर्ध या संस्कृत शब्दापासून झालेली असून अर्धचे अपभृष्ट रुप आड असा होतो. तर काहींच्यामते अड्ड या कन्नड शब्दावरून आड शब्द आलेला असून ज्याच्या आश्रयाने आपण वावरतो त्याचे नाव म्हणजे आडनाव. त्यामुळे आडनाव म्हणजे उपनाम किंवा आध्यनाव असे असल्याने ते आध्य अर्थातच अगोदरचे किंवा सुरुवातीचे असे असलेतरी ते शेवटी वापरले जाते. एखाद्या व्यक्ति किंवा कुटुंबाचा अचूक निर्देश व्हावा म्हणून आडनाव लावण्याची प्रथा प्रचलित झालेली असावी. त्यामुळे ज्याच्या आश्रयाने आपण जन्मलो किंवा वाढलो त्याचे नाव म्हणजे आडनाव. मध्ययुगात आडनावे लावली जात नव्हती असे म्हणणे चुकीचे असून खरंतर त्याची गरजच नव्हती. विशेषत: कनिष्ठ वर्गाला जमीन ना जुमला इतर कुठल्याही संधी नसल्याने स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मागासवर्गात आडनावाऐवजी जात लावली जायची. राजर्षी शाहू सारख्या पुरोगाम्यांनी अशा वर्गाला घाडगे नाव दिले. त्यामुळे पारधी समाजात भोसले , पवार , काळे यासारखी आडनावे मोठ्या प्रमाणावर दिसतात. काही अपवाद ...