देवक भाग 2
देवक ( भाग 2 ) प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044 मागच्या भागात देवक या संकल्पनेची चर्चा केल्यानुसार देवकाशी कुळाचा रक्तसंबंध किंवा काही गूढ ऋणानुबंध असावा अशी कल्पना आहे. प्रत्येक कुळाला आपल्या देवकाविषयी आदर व भक्ती असते. ज्या प्राण्याला कुळाने देवक मानले असेल, त्याचे मांस त्या कुळातील माणसे खात नाहीत. एवढेच नव्हेतर त्याला आपल्या उपयोगासाठी राबवूनही घेत नसत. देवक वृक्षाची पाने, फळे, फुले व लाकूड यांचा उपयोग करीत नाहीत. देवक मानलेला प्राणी मरण पावला की, त्याचे सुतक पाळतात. त्याचे कातडे विशेष समारंभात अंगावर घेतात. काही लोक अशा प्राण्याची चित्रे अंगावर गोंदवून घेतात, सर्व देह त्याच्यासारखा रंगवतात. देवकाचे तीन भागात वर्गीकरण करता येईल. 1.प्राणी देवके- घोडा, गरुड, रेडा, हत्ती, वानर, चितळ, डुक्कर, कासव, कासव, मोर, लांडगा, बकरा,सांबर 2. वनस्पती देवके – आंबा, चिंच, बेल, निंब, बाभूळ, बोर, कदंब, शमी, वड, उंबर इत्यादी 3. वस्तू देवके – कुर्हातड, फुंकणी, सूरी, चिमटा, तलवार, तेलघाणा, मीठ, भात, लोखंड इत्यादी. या अर्थाने कुठल्याही वृक्षाची पुजा केली म्हणजे...