पोस्ट्स

जून २१, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवजन्मपूर्व थोरला दुष्काळ

इमेज
दै. एकमतमध्ये दर रविवारी  जागर स्वराज्याचा ही लेखमाला सुरु झाली आहे.  शिवजन्मपूर्व थोरला दुष्काळ                       देश आणि दुष्काळ या बाबी एकमेकांशी निगडित आहेत. कारण या देशाचा इतिहास पाहिल्यास दर १० ते १५ वर्षांनी मोठे दुष्काळ पडलेले दिसतात. परकीय प्रवाशांनी याबाबतचे वर्णन केल्याने आपणाला भारतातील दुष्काळाची माहिती मिळते. त्यानुसार ‘मध्ययुगीन भारताचा आर्थिक इतिहास’ लिहिणा-या मोर लँड नावाच्या संशोधकाने लिहून ठेवले की, सन १६१४-१५, १६३०, १६३५, १६४१, १६४२, १६४३, १६४५, ४६, १६४७, १६४८, १६५०, १६५८, १६५९, ६० याप्रमाणे लहान-मोठे दुष्काळ पडलेले आहेत.  याप्रमाणे या पाच-पन्नास वर्षांत सर्वांत मोठा दुष्काळ हा शिवजन्मा वेळी म्हणजेच १६३० ला पडलेला होता म्हणून या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हटले गेले आहे. या दुष्काळाविषयी परकीय प्रवाशांनी अतिशय मार्मिकपणे आपले लेखन केले आहे. त्यानुसार डच व्यापारी व्हॅन- ट्विस्ट लिहितो की, ‘पाऊस इतका अल्प पडला की पेरणी केलेले बी तर वाया गेलेच पण गवत सुद्धा उगवले नाही, माणसे शहर...