बेलवडीची राणी मल्लमा...
राणी मल्लाम्मावरील स्वारी आणि मराठा सैनिकाची बदनामी प्रा. डॉ. सतीश कदम छत्रपती शिवरायांच्या सामाजिक कार्याची नोंद शत्रूंनीसुद्धा चांगल्या शब्दात घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही इतिहासकाराने त्यांच्यावर कधी कुठला ठपका ठेवला नाही. स्त्रियांप्रती राजांची नीती सर्वश्रुत आहे. कारंजा स्वारीप्रसंगी महिलाच नाहीतर महिलांच्या वेशातील पुरूषांनाही मराठा सैनिकांनी सुखरूपपणे जाऊ दिले होते. कधी कधी अतिशोक्तीच्या नादात आपण काय सांगून जातो याचेही काहींना भान रहात नाही. असाच एक प्रसंग छत्रपती शिवराय आणि बेलवडीची राणी मल्लामा यांच्यातील युद्धाचा असून त्यात मराठ्यांचे सेनानी सखोजी गायकवाड यांनी त्या राणीवर अत्याचार केला असे चुकीचे लेखन आणि कथन केल्याने ही एकप्रकारे मराठा सैनिकाची बदनामी आहे. हा प्रसंग आहे छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी जानेवारी 1677 ते एप्रिल 1678 या दरम्यान आपली कर्नाटक स्वारी पूर्ण केली. यात महाराजांना अदभुतपूर्व असे...