पोस्ट्स

जानेवारी २३, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सतीश कदम  इतिहास विषयातील नवनवीन संशोधन, लेखन आणि विचार याची देवघेव व्हावी म्हणून अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद ही संस्था मागील तीस वर्षापासून कार्यरत असून दरवर्षी परिषदेची अधिवेशन होत असतात. त्यानुसार यावर्षीचे अधिवेशन दिनांक 19 आणि 20 जानेवारी 2024 ( शनिवार आणि रविवार ) असे दोन दिवस नेवासाफाटा जि. अहमदनगर याठिकाणी संपन्न होत असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी इतिहास संशोधक डॉ. सतीश कदम यांची निवड झालेली आहे. डॉ. जयसिंगराव पवार, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इतिहास परिषदेचे कामकाज चालत असून त्या माध्यमातून अनेक नवीन विषयावर चर्चा घडवून संशोधांनात्मक मांडणी केली जाते. देशभरातील इतिहास संशोधक यासाठी आवर्जून हजेरी लावत असतात. त्यानुसार यावर्षीचे अधिवेशन हे नेवासा याठिकाणी संपन्न होत असून या अधिवेशांनासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश कदम यांची निवड झाली आहे. गत तीस वर्षापासून डॉ. कदम हे तुळजापूर याठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास संशोधांनातील उल्लेखनीय कामाबद्...