पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नळदुर्ग किल्ल्याचा आकार "ळ" सारखा, रणमंडलचा आकार "न" सारखा तर प्रवेशद्वाराचा आकार "ड" सारखा....

  नळदुर्ग किल्ल्याचा आकार "ळ" सारखा, रणमंडलचा आकार "न" सारखा तर प्रवेशद्वाराचा आकार "ड" सारखा.... सहाव्या शतकापासून नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास सापडत असलातरी महत्वाची बाब म्हणजे मुळात तिथं दोन स्वतंञ किल्ले तयार झाले, एक रणमंडल आणि दुसरा नळदुर्ग म्हणजे शहादुर्ग..1351 ला बहामनीचा दिवाण महमद गवाणने 3 किमी लांबीची व 114 बुरुजाची दगडी तटबंदी पुर्ण केली. 125 एकरावर पसारलेला किल्ला पुढे1489 ला विजापूरच्या आदिलशाहकडे गेल्यानंतर आजचा उपली बुरुजासह अनेक कामे केली. पुढे हिजरी 1022 म्हणजे इ.स. 1613 मध्ये इब्राहिम आदिलशाहने बोरी नदीला किल्ल्यात वळवून 275 फूट लांब 90 फूट उंच व 31 फूट रुंद असणारे जगावेगळे धरण बांधले. बंधाऱ्याच्या आतील बाजूला पाणी महाल, कारंजे, पाणी चक्की बसविली. बंधाऱ्यावरुन दोन सांडव्यातून पाणी बाहेर काढल्याने धबधबे तयार झाले. ज्याला नर - मादी धबधबे म्हटले गेले. मादी धबधबा खाली असल्याने त्यातून गढूळ पाणी बाहेर पडते तर नर धबधबा वर असल्याने व त्याला उतारही भरपूर असल्याने फेसाळ पाणी दिसते. यातून नर आणि नारीचा स्वभावगुण सांगण्याचा प्रयत्न केलेल...