पोस्ट्स

जून ३०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजाचे कुर्ले

 राजाचा भाऊ राहायला गेला, म्हणून गावाचे नाव पडले राजाचे कुर्ले.. प्रा. डॉ. सतीश कदम स्वातंत्र्यपूर्व कालखंडात महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या अक्कलकोट संस्थानवर राजे भोसले घराणे राज्यकारभार करत असून घराण्याचा इतिहास मोठा रंजक आहे. त्यानुसार या घराण्याचे मुळ पुरुष राणोजी लोखंडे पाटील हे असून छत्रपती संभाजीपुत्र शाहूमहाराजांनी राणोजीला आपले मानसपुत्र माणून त्यांना फत्तेसिंग भोसले नाव देत आपल्या पदरी ठेवून घेतले. 1713 साली राजे किताबासह अक्कलकोटची जहागीर दिली. वास्तविक पाहता अक्कलकोट हे औरंगजेबाने शाहूराजांच्या दुय्यम पत्नी विरुबाईसाहेबांना दिलेली जहागीर होती. अक्कलकोट संस्थानचे क्षेत्रफळ 498 स्क्वेअर मैल होऊन त्याचा महसूल 668392 रुपये होता. संस्थानात 110 गावे मोडत असून सातारच्या राजाच्या नेतृत्वाखाली कारभार करत होते. छत्रपती शाहूचे अभयदान असल्याने अक्कलकोट संस्थान मोठ्या नावारूपाला पोहोचले होते. 1760 ला फत्तेसिंहमहाराजांच्या निधनानंतर गादीला वारस नसल्याने शोधाशोध सुरू झाली. तत्पूर्वी फत्तेसिंहमहाराजांच्या हयातीतच त्यांचे बंधु बाबाजी लोखंडेपाटील यांना पिलीव ता. माळशिरस जि. सोलापूर ये...