पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सतीश कदम  इतिहास विषयातील नवनवीन संशोधन, लेखन आणि विचार याची देवघेव व्हावी म्हणून अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद ही संस्था मागील तीस वर्षापासून कार्यरत असून दरवर्षी परिषदेची अधिवेशन होत असतात. त्यानुसार यावर्षीचे अधिवेशन दिनांक 19 आणि 20 जानेवारी 2024 ( शनिवार आणि रविवार ) असे दोन दिवस नेवासाफाटा जि. अहमदनगर याठिकाणी संपन्न होत असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी इतिहास संशोधक डॉ. सतीश कदम यांची निवड झालेली आहे. डॉ. जयसिंगराव पवार, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इतिहास परिषदेचे कामकाज चालत असून त्या माध्यमातून अनेक नवीन विषयावर चर्चा घडवून संशोधांनात्मक मांडणी केली जाते. देशभरातील इतिहास संशोधक यासाठी आवर्जून हजेरी लावत असतात. त्यानुसार यावर्षीचे अधिवेशन हे नेवासा याठिकाणी संपन्न होत असून या अधिवेशांनासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश कदम यांची निवड झाली आहे. गत तीस वर्षापासून डॉ. कदम हे तुळजापूर याठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास संशोधांनातील उल्लेखनीय कामाबद्...
  बौद्ध आणि मुस्लिम राष्ट्रातील रामायण भारतच नाहीतर आशिया खंडातील अनेक देशात हजारो वर्षापासून रामायण हे महाकाव्य राष्ट्रीय ग्रंथाच्या स्वरुपात पूजले जाते. दळणवळणातील क्रांतीमुळे हजारो वर्षाचा इतिहास सहजपणे उलगडणे शक्य झाल्यामुळे नेपाळपासून ते इंडोनेशियापर्यंतचा श्रीरामचरित्राचा प्रवास आश्चर्यकारक आहे. वाल्मिकीनी इसवी सनपूर्व 600 वर्षापुर्वी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाला प्राथमिक दर्जा असून त्यात 7 अध्याय व   24000 श्लोकात आदर्श संस्कृतीचे चित्रण आहे. जगण्याचा आदर्श मार्ग म्हणून याकडे पहिल्याने   रामायणासारख्या महाकाव्याला प्रत्येकाने आपल्या परीने लिहिले. केवळ भारतात 300 पेक्षा अधिक रामायणाचे प्रकार असून तुलसीदासचे रामचरितमानस नंतर तमिळमधील कम्बरामायण , केरळमधील रामचरितम , तेलगूमधील रंगनाथ रामायण , कर्नाटक पम्प रामायण , गुजरात गिरधर रामायण , उडीशा कृत रामायण , आसाम माधव कंदली रामायण , बंगाल कृत्तिवास रामायण , मराठीतील भावार्थ रामायण तर उर्दूमधील चक्रबस्त रामायण प्रसिद्ध आहेत. याशिवाय अकबराने 16 व्या शतकात बदायुनीकडून रामायणाचे फारसीमध्ये   भाषांतर करून घेतल...