पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कानडी भाषेत वेगवेगळ्या नात्यागोत्यांची नावे काय आहेत

  कानडी भाषेत वेगवेगळ्या नात्यागोत्यांची नावे काय आहेत? आई -  तायी ,  अम्मा , किंवा  अव्वा वडील -  तंदे  किंवा  अप्पा दादा -  अण्णा ; वहिनी -  अत्तिगे ताई -  अक्का ; भावजी -  भावा धाकटा भाऊ -  तम्मा ; धाकटी बहीण -  तंगी आज्जी -  आज्जी ; आजोबा -  आज्जा / ताता मुलगा -  मगा ; मुलगी -  मगळु नवरा -  गंडा ; बायको -  हेण्डती ,  मडदी मूल/बाळ -  मगु / कंदा / कूसु नात -  मोम्मगळु ; नातू -  मोम्मगा आत्या/सासू -  आत्या / आत्ते मामा/सासरे -  मामा / मावा सून -  सोसे ; जावई -  अळिया थोरली काकू/आईपेक्षा थोरली मावशी -  दोड्डम्मा ,  दोडव्वा धाकटी काकू/आईपेक्षा लहान मावशी -  चिक्कम्मा ,  चिगव्वा थोरले काका -  दोड्डप्पा ; धाकटे काका -  चिक्कप्पा नणंद -  नादिनी ; मेहुणा -  मैदुना दीर -  भावमैदा  (बोलीभाषेत  बामैदा ) व्याही -  बीगरु नातलग -  नेंटरु मित्र -  गेळेया ,  दोस्त

भारत आणि जपानमधील आडनावाचे टप्पे

  भारत आणि जपानमधील आडनावाचे टप्पे  विश्वकोशातील व्याख्येनुसार आडनाव शब्दाचा अर्थ उपनाम किंवा अधिकनाम असून त्याची उत्पत्ति अर्ध या संस्कृत शब्दापासून झालेली असून अर्धचे अपभृष्ट रुप आड असा होतो. तर काहींच्यामते अड्ड या कन्नड शब्दावरून आड शब्द आलेला असून ज्याच्या आश्रयाने आपण वावरतो त्याचे नाव म्हणजे आडनाव. त्यामुळे आडनाव म्हणजे उपनाम किंवा आध्यनाव असे असल्याने ते आध्य अर्थातच अगोदरचे किंवा सुरुवातीचे असे असलेतरी ते शेवटी वापरले जाते. एखाद्या व्यक्ति किंवा कुटुंबाचा अचूक निर्देश व्हावा म्हणून आडनाव लावण्याची प्रथा प्रचलित झालेली असावी. त्यामुळे ज्याच्या आश्रयाने आपण जन्मलो किंवा वाढलो त्याचे नाव म्हणजे आडनाव. मध्ययुगात आडनावे लावली जात नव्हती असे म्हणणे चुकीचे असून खरंतर त्याची गरजच नव्हती. विशेषत: कनिष्ठ वर्गाला जमीन ना जुमला इतर कुठल्याही संधी नसल्याने स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मागासवर्गात आडनावाऐवजी जात लावली जायची. राजर्षी शाहू सारख्या पुरोगाम्यांनी अशा वर्गाला घाडगे नाव दिले. त्यामुळे पारधी समाजात भोसले , पवार , काळे यासारखी आडनावे मोठ्या प्रमाणावर दिसतात. काही अपवाद ...

गनिमी कावा

http://hdl.handle.net/10603/78669   Shivkalin maratha senapatiche ganimi kava yudhanitidware swaraj ubaharnititil yogdan 1645 te 1707

राजाचे कुर्ले

 राजाचा भाऊ राहायला गेला, म्हणून गावाचे नाव पडले राजाचे कुर्ले.. प्रा. डॉ. सतीश कदम स्वातंत्र्यपूर्व कालखंडात महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या अक्कलकोट संस्थानवर राजे भोसले घराणे राज्यकारभार करत असून घराण्याचा इतिहास मोठा रंजक आहे. त्यानुसार या घराण्याचे मुळ पुरुष राणोजी लोखंडे पाटील हे असून छत्रपती संभाजीपुत्र शाहूमहाराजांनी राणोजीला आपले मानसपुत्र माणून त्यांना फत्तेसिंग भोसले नाव देत आपल्या पदरी ठेवून घेतले. 1713 साली राजे किताबासह अक्कलकोटची जहागीर दिली. वास्तविक पाहता अक्कलकोट हे औरंगजेबाने शाहूराजांच्या दुय्यम पत्नी विरुबाईसाहेबांना दिलेली जहागीर होती. अक्कलकोट संस्थानचे क्षेत्रफळ 498 स्क्वेअर मैल होऊन त्याचा महसूल 668392 रुपये होता. संस्थानात 110 गावे मोडत असून सातारच्या राजाच्या नेतृत्वाखाली कारभार करत होते. छत्रपती शाहूचे अभयदान असल्याने अक्कलकोट संस्थान मोठ्या नावारूपाला पोहोचले होते. 1760 ला फत्तेसिंहमहाराजांच्या निधनानंतर गादीला वारस नसल्याने शोधाशोध सुरू झाली. तत्पूर्वी फत्तेसिंहमहाराजांच्या हयातीतच त्यांचे बंधु बाबाजी लोखंडेपाटील यांना पिलीव ता. माळशिरस जि. सोलापूर ये...

माने घराण्याचा इतिहास

 माने घराण्याचा संक्षिप्त इतिहास प्रा. डॉ. सतीश कदम महाराष्ट्रात जी काही नामांकित लढवय्यी घराणी झाली त्यात माने घराण्याचा समावेश असून राष्ट्रकूटांचे वंशज असणाऱ्या मानेंचे गरुड हे देवक असून माण देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजाला माने हे नाव मिळाले असावे. सिद्धनाथाच्या वास्तव्याने पावन झालेल्या म्हसवड नगरीतून माने घराण्याच्या पराक्रमाला सुरुवात झाली असून बहमनी कालखंडात पाठकोजी हे माने घराण्याचे मूळ पुरुष असून ते देशमुखी वतनदार होते. त्यांचे पुत्र सिदोजी माने हे इब्राहीम आदिलशाहच्या कालखंडात मोठ्या हुद्यावर पोहोचले. सिध्दनाथाला कुलदैवत मानणाऱ्या सिदोजीसोबत नेहमी देवाच्या पादुका आणि बटवा असायचा. सिदोजीला चिलोजी आणि नरसिंहराव ही दोन मुले तर नरसिंहरावाला सिदोजी, चिमोजी, अग्नोजी, खेत्रोजी आणि रथाजी असे पाचपुत्र असून यातील रथाजीची कारकीर्द फारच गाजली. रतोजीला नागोजी नावाचा मुलगा असून मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीच्यावेळी ते मोगलाकडे गेले, तेव्हा औरंगजेबाने त्यांना राजे हा किताब आणि म्हसवड, दहीगाव, अकलूज, भाळवणी, कासेगाव, ब्रम्हपुरी, सांगोले, आटपाडी, नाझरे, वेळापूऱ, कण्हेर, हिंगणी, गरवाद गावच्य...

96 कुळाचा इतिहास, हैदराबाद मुक्तिसंग्रामात असे झुंजलोआम्ही, जागर स्वराज्याचा, गाळीव इतिहास भाग दोन

इमेज
  आपली किंमत 1350 रुपये सवलतीच्या दरात एक हजार फक्त मोफत डिलिव्हरी  

निवडणुकीचे किस्से

इमेज
 

पांढरे मोगल

इमेज
 

अजिंठ्याची पारू

इमेज
 

गाळीव इतिहास न वाचलेल्या न ऐकलेल्या ऐतिहासिक कथा एकत्रित या पुस्तकात वाचायला मिळतील

इमेज
 आत डॉक्टर सतीश कदम पुस्तकांसाठी संपर्क करा 94 22 65 00 44

संभाजीराजांच्या हत्या आणि गुढीपाडवा

 छ्त्रपती संभाजीराजे  आणि गुढी पाडवा   छ्त्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपूर्व गुढीपाडव्याचे ऐतिहासिक संदर्भ        गुढी पाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून हिंदूच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 30 म्हणजेच आमवस्या.  याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात राजांच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याचा प्रघात सुरू झाला असा कुठलाही संदर्भ नाही. यासाठी खुले आवाहन दिलेतरी ते वावगे ठरणार नाही.  वाद घालण्यापेक्षा गुढी पाडव्याचे पुढील संदर्भ वाचल्यास यामागची सत्यता ध्यानात येऊ शकेल.  1. गुढी आणि शंकरपार्वती- डॉ. आ.ह. साळुंके  कानडी भाषेतील गुढीचा उल्लेख  महात्मा बसवेश्वर ( कालखंड 1105 ते 1167 ) ओडेयरू बंदडे गुडी तोरणव कट्टी | याचा अर्थ जेष्ठांचे म्हणजेच शरणाचे आगम...
इमेज
महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सतीश कदम  इतिहास विषयातील नवनवीन संशोधन, लेखन आणि विचार याची देवघेव व्हावी म्हणून अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद ही संस्था मागील तीस वर्षापासून कार्यरत असून दरवर्षी परिषदेची अधिवेशन होत असतात. त्यानुसार यावर्षीचे अधिवेशन दिनांक 19 आणि 20 जानेवारी 2024 ( शनिवार आणि रविवार ) असे दोन दिवस नेवासाफाटा जि. अहमदनगर याठिकाणी संपन्न होत असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी इतिहास संशोधक डॉ. सतीश कदम यांची निवड झालेली आहे. डॉ. जयसिंगराव पवार, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इतिहास परिषदेचे कामकाज चालत असून त्या माध्यमातून अनेक नवीन विषयावर चर्चा घडवून संशोधांनात्मक मांडणी केली जाते. देशभरातील इतिहास संशोधक यासाठी आवर्जून हजेरी लावत असतात. त्यानुसार यावर्षीचे अधिवेशन हे नेवासा याठिकाणी संपन्न होत असून या अधिवेशांनासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश कदम यांची निवड झाली आहे. गत तीस वर्षापासून डॉ. कदम हे तुळजापूर याठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास संशोधांनातील उल्लेखनीय कामाबद्...
  बौद्ध आणि मुस्लिम राष्ट्रातील रामायण भारतच नाहीतर आशिया खंडातील अनेक देशात हजारो वर्षापासून रामायण हे महाकाव्य राष्ट्रीय ग्रंथाच्या स्वरुपात पूजले जाते. दळणवळणातील क्रांतीमुळे हजारो वर्षाचा इतिहास सहजपणे उलगडणे शक्य झाल्यामुळे नेपाळपासून ते इंडोनेशियापर्यंतचा श्रीरामचरित्राचा प्रवास आश्चर्यकारक आहे. वाल्मिकीनी इसवी सनपूर्व 600 वर्षापुर्वी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाला प्राथमिक दर्जा असून त्यात 7 अध्याय व   24000 श्लोकात आदर्श संस्कृतीचे चित्रण आहे. जगण्याचा आदर्श मार्ग म्हणून याकडे पहिल्याने   रामायणासारख्या महाकाव्याला प्रत्येकाने आपल्या परीने लिहिले. केवळ भारतात 300 पेक्षा अधिक रामायणाचे प्रकार असून तुलसीदासचे रामचरितमानस नंतर तमिळमधील कम्बरामायण , केरळमधील रामचरितम , तेलगूमधील रंगनाथ रामायण , कर्नाटक पम्प रामायण , गुजरात गिरधर रामायण , उडीशा कृत रामायण , आसाम माधव कंदली रामायण , बंगाल कृत्तिवास रामायण , मराठीतील भावार्थ रामायण तर उर्दूमधील चक्रबस्त रामायण प्रसिद्ध आहेत. याशिवाय अकबराने 16 व्या शतकात बदायुनीकडून रामायणाचे फारसीमध्ये   भाषांतर करून घेतल...