देवक
मराठ्यातील देवक देवक संकल्पना महाराष्ट्रातील मराठा व इतर बारा बलुतेदारात देवक ही संकल्पना प्राचीन असून खासकरून लग्नकार्यासारख्या विधीमध्ये याचा वापर होतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज ही संकल्पना बुरसट वाटत असलीतरी त्या त्या कालखंडाचा तो एक ठोकताळा आहे. समान रक्त आणि नातेसंबंध याच्या फायद्यातोट्यासाठी देवक ही संकल्पना आजही कार्यरत आहे. याविषयी मतमतांतरे असलीतरी याठिकाणी देवकाच्या इतिहासावर फक्त भाष्य केलेले आहे. Dr. Satish kadam मराठे व इतर समाजात परंपरेने मानली जाणारी ही एक देवकल्पना आहे. प्राचीन काळापासून अनेक अनार्य जाती जमाती आणि द्रविड वंशातील लोकांनी आपल्या कुळांना पशुपक्षी, वनस्पती किंवा एखादी वस्तू यांची नावे दिली. अशा कुळांना त्या वस्तूवरून ओळखले जाऊ लागले. तेच त्या कुळाचे देवक झाले. एकंदरीत त्या पशू, वनस्पती किंवा वस्तूला देवाचे स्थान दिले. देवकाचा त्या त्या कुळाशी रक्तसंबंध किंवा काही गूढ संबंध असावा. मराठी विश्वकोशात देवकाविषयी पुढील मत मांडण्यात आलेले आहे, देवक कल्पनेची उत्पत्ती बरीचशी गूढ आहे. प्रत्येक कुलातील लोक विशिष्ट वनस्पती किंवा प्राणी यांच्याव...