पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अणाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत

इमेज
डॉ. सतीश कदम  अनाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत   टीव्ही वरील छ्त्रपती संभाजी मालि केतील गाजलेल्या अनाजीपंता च्या भूमिकेने वेगळा रंग आणला. छ्त्रपती संभाजीराजे त्याला कधी शिक्षा देणार ? त्याचे पुढे काय होणार वगैरे ... यातील अनाजीपंत म्हणजे अण्णाजी दत्तो कुलकर्णीच्या मूळ गावाविषयी इतिहासाला फारशी माहिती नाही. तरीपरंतु अनाजी हा साधारणपणे इ. स. 1646 च्या आसपास शहाजीराजेंच्या तालमीत तयार होऊन छ्त्रपती शिवरायांच्या सेवेत दाखल झाला. शिवरायांच्या अनेक मोहिमात त्याने भाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे अफजलखान चालून आला त्यावेळी राजे प्रतापगडाकडे गेले. तेव्हा पाठीमागे जिजाऊ साहेब आणि संभाजी राजे यांच्या देखरेखीसाठी महाराजांनी अनाजीची नेमणूक केली होती , पुढे कोंडाजी फर्जन्दने ज्यावेळी अतिशय कमी सैन्याच्या जोरावर पन्हाळा जिंकून घ्यायचा बेत आखला तेव्हा हाच अनाजी स्वारीच्या पाठीमागची फळी सांभाळत होता. तर छत्रपती शिवाजीराजे शंभूराजासह ज्यावेळी औरंगजेबाच्या भेठीसाठी आग्र्याला गेले तेव्हाही जिजाऊसाहेबांच्या देखरेखीखाली स्वराज्याची जबाबदारी सांभाळण्याचे काम अनाजीने केले. अनाजीला संगमेश्वरचे कु...