पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्रपती संभाजी महाराज समज गैरसमज

इमेज
 https://youtu.be/-xkRed7oGFs छत्रपती संभाजी महाराज समाज आणि गैरसमज यावर सविस्तर विश्लेषण

देवक भाग 2

इमेज
 देवक ( भाग 2 ) प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044 मागच्या भागात देवक या संकल्पनेची चर्चा केल्यानुसार देवकाशी कुळाचा रक्तसंबंध किंवा काही गूढ ऋणानुबंध  असावा अशी कल्पना आहे. प्रत्येक कुळाला आपल्या देवकाविषयी आदर व भक्ती असते. ज्या प्राण्याला कुळाने देवक मानले असेल, त्याचे मांस त्या कुळातील माणसे खात नाहीत. एवढेच नव्हेतर त्याला आपल्या उपयोगासाठी राबवूनही घेत नसत. देवक वृक्षाची पाने, फळे, फुले व लाकूड यांचा उपयोग करीत नाहीत. देवक मानलेला प्राणी मरण पावला की, त्याचे सुतक पाळतात. त्याचे कातडे विशेष समारंभात अंगावर घेतात. काही लोक अशा प्राण्याची चित्रे अंगावर गोंदवून घेतात, सर्व देह त्याच्यासारखा रंगवतात. देवकाचे तीन भागात वर्गीकरण करता येईल.  1.प्राणी देवके- घोडा, गरुड, रेडा, हत्ती, वानर, चितळ, डुक्कर, कासव, कासव, मोर, लांडगा,  बकरा,सांबर  2. वनस्पती देवके  – आंबा, चिंच, बेल, निंब, बाभूळ, बोर, कदंब, शमी, वड, उंबर इत्यादी  3. वस्तू देवके – कुर्हातड, फुंकणी, सूरी, चिमटा, तलवार, तेलघाणा, मीठ, भात, लोखंड इत्यादी.  या अर्थाने कुठल्याही वृक्षाची पुजा केली म्हणजे...

देवक

इमेज
 मराठ्यातील देवक  देवक संकल्पना महाराष्ट्रातील मराठा व इतर बारा बलुतेदारात देवक ही संकल्पना प्राचीन असून खासकरून लग्नकार्यासारख्या विधीमध्ये याचा वापर होतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज ही संकल्पना बुरसट वाटत असलीतरी त्या त्या कालखंडाचा तो एक ठोकताळा आहे. समान रक्त आणि नातेसंबंध याच्या फायद्यातोट्यासाठी देवक ही संकल्पना आजही कार्यरत आहे. याविषयी मतमतांतरे असलीतरी याठिकाणी देवकाच्या इतिहासावर फक्त भाष्य केलेले आहे.  Dr. Satish kadam  मराठे व इतर समाजात परंपरेने मानली जाणारी ही एक देवकल्पना आहे. प्राचीन काळापासून अनेक अनार्य जाती जमाती आणि द्रविड वंशातील लोकांनी आपल्या कुळांना पशुपक्षी, वनस्पती किंवा एखादी वस्तू यांची नावे दिली. अशा कुळांना त्या वस्तूवरून ओळखले जाऊ लागले. तेच त्या कुळाचे देवक झाले. एकंदरीत त्या पशू, वनस्पती किंवा वस्तूला देवाचे स्थान दिले. देवकाचा त्या त्या कुळाशी रक्तसंबंध किंवा काही गूढ संबंध असावा. मराठी विश्वकोशात देवकाविषयी पुढील मत मांडण्यात आलेले आहे, देवक कल्पनेची उत्पत्ती बरीचशी गूढ आहे. प्रत्येक कुलातील लोक विशिष्ट वनस्पती किंवा प्राणी यांच्याव...

सूर्यवंशी आणि चंद्रवंशी म्हणजे काय

इमेज
खालील  लिंकवर यू ट्यूबवर पहा  - https://youtu.be/cI1vXVMpOTY

Jagdale Clan

इमेज
 http://m.epunyanagari.com/imageview_103075_4645_4_71_31-05-2021_4_i_1_sf.html

बेलवडीची राणी मल्लमा...

इमेज
  राणी मल्लाम्मावरील स्वारी आणि मराठा सैनिकाची बदनामी          प्रा. डॉ. सतीश कदम                       छत्रपती शिवरायांच्या सामाजिक कार्याची नोंद शत्रूंनीसुद्धा चांगल्या शब्दात घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही इतिहासकाराने त्यांच्यावर कधी कुठला ठपका ठेवला नाही. स्त्रियांप्रती राजांची नीती सर्वश्रुत आहे. कारंजा स्वारीप्रसंगी महिलाच नाहीतर महिलांच्या वेशातील पुरूषांनाही मराठा सैनिकांनी सुखरूपपणे जाऊ दिले होते. कधी कधी अतिशोक्तीच्या नादात आपण काय सांगून जातो याचेही काहींना भान रहात नाही. असाच एक प्रसंग छत्रपती शिवराय आणि बेलवडीची राणी  मल्लामा यांच्यातील युद्धाचा असून त्यात मराठ्यांचे सेनानी सखोजी गायकवाड यांनी त्या राणीवर अत्याचार केला असे चुकीचे लेखन आणि कथन केल्याने ही एकप्रकारे मराठा सैनिकाची बदनामी आहे.  हा प्रसंग आहे छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा. शिवराज्याभिषेकानंतर  महाराजांनी जानेवारी 1677 ते एप्रिल 1678 या दरम्यान आपली कर्नाटक स्वारी पूर्ण केली. यात महाराजांना अदभुतपूर्व असे...

अणाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत

इमेज
डॉ. सतीश कदम  अनाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत   टीव्ही वरील छ्त्रपती संभाजी मालि केतील गाजलेल्या अनाजीपंता च्या भूमिकेने वेगळा रंग आणला. छ्त्रपती संभाजीराजे त्याला कधी शिक्षा देणार ? त्याचे पुढे काय होणार वगैरे ... यातील अनाजीपंत म्हणजे अण्णाजी दत्तो कुलकर्णीच्या मूळ गावाविषयी इतिहासाला फारशी माहिती नाही. तरीपरंतु अनाजी हा साधारणपणे इ. स. 1646 च्या आसपास शहाजीराजेंच्या तालमीत तयार होऊन छ्त्रपती शिवरायांच्या सेवेत दाखल झाला. शिवरायांच्या अनेक मोहिमात त्याने भाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे अफजलखान चालून आला त्यावेळी राजे प्रतापगडाकडे गेले. तेव्हा पाठीमागे जिजाऊ साहेब आणि संभाजी राजे यांच्या देखरेखीसाठी महाराजांनी अनाजीची नेमणूक केली होती , पुढे कोंडाजी फर्जन्दने ज्यावेळी अतिशय कमी सैन्याच्या जोरावर पन्हाळा जिंकून घ्यायचा बेत आखला तेव्हा हाच अनाजी स्वारीच्या पाठीमागची फळी सांभाळत होता. तर छत्रपती शिवाजीराजे शंभूराजासह ज्यावेळी औरंगजेबाच्या भेठीसाठी आग्र्याला गेले तेव्हाही जिजाऊसाहेबांच्या देखरेखीखाली स्वराज्याची जबाबदारी सांभाळण्याचे काम अनाजीने केले. अनाजीला संगमेश्वरचे कु...