कानडी भाषेत वेगवेगळ्या नात्यागोत्यांची नावे काय आहेत
कानडी भाषेत वेगवेगळ्या नात्यागोत्यांची नावे काय आहेत? आई - तायी , अम्मा , किंवा अव्वा वडील - तंदे किंवा अप्पा दादा - अण्णा ; वहिनी - अत्तिगे ताई - अक्का ; भावजी - भावा धाकटा भाऊ - तम्मा ; धाकटी बहीण - तंगी आज्जी - आज्जी ; आजोबा - आज्जा / ताता मुलगा - मगा ; मुलगी - मगळु नवरा - गंडा ; बायको - हेण्डती , मडदी मूल/बाळ - मगु / कंदा / कूसु नात - मोम्मगळु ; नातू - मोम्मगा आत्या/सासू - आत्या / आत्ते मामा/सासरे - मामा / मावा सून - सोसे ; जावई - अळिया थोरली काकू/आईपेक्षा थोरली मावशी - दोड्डम्मा , दोडव्वा धाकटी काकू/आईपेक्षा लहान मावशी - चिक्कम्मा , चिगव्वा थोरले काका - दोड्डप्पा ; धाकटे काका - चिक्कप्पा नणंद - नादिनी ; मेहुणा - मैदुना दीर - भावमैदा (बोलीभाषेत बामैदा ) व्याही - बीगरु नातलग - नेंटरु मित्र - गेळेया , दोस्त