पोस्ट्स

Jagdale Clan

इमेज
 http://m.epunyanagari.com/imageview_103075_4645_4_71_31-05-2021_4_i_1_sf.html

बेलवडीची राणी मल्लमा...

इमेज
  राणी मल्लाम्मावरील स्वारी आणि मराठा सैनिकाची बदनामी          प्रा. डॉ. सतीश कदम                       छत्रपती शिवरायांच्या सामाजिक कार्याची नोंद शत्रूंनीसुद्धा चांगल्या शब्दात घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही इतिहासकाराने त्यांच्यावर कधी कुठला ठपका ठेवला नाही. स्त्रियांप्रती राजांची नीती सर्वश्रुत आहे. कारंजा स्वारीप्रसंगी महिलाच नाहीतर महिलांच्या वेशातील पुरूषांनाही मराठा सैनिकांनी सुखरूपपणे जाऊ दिले होते. कधी कधी अतिशोक्तीच्या नादात आपण काय सांगून जातो याचेही काहींना भान रहात नाही. असाच एक प्रसंग छत्रपती शिवराय आणि बेलवडीची राणी  मल्लामा यांच्यातील युद्धाचा असून त्यात मराठ्यांचे सेनानी सखोजी गायकवाड यांनी त्या राणीवर अत्याचार केला असे चुकीचे लेखन आणि कथन केल्याने ही एकप्रकारे मराठा सैनिकाची बदनामी आहे.  हा प्रसंग आहे छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा. शिवराज्याभिषेकानंतर  महाराजांनी जानेवारी 1677 ते एप्रिल 1678 या दरम्यान आपली कर्नाटक स्वारी पूर्ण केली. यात महाराजांना अदभुतपूर्व असे...

अणाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत

इमेज
डॉ. सतीश कदम  अनाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत   टीव्ही वरील छ्त्रपती संभाजी मालि केतील गाजलेल्या अनाजीपंता च्या भूमिकेने वेगळा रंग आणला. छ्त्रपती संभाजीराजे त्याला कधी शिक्षा देणार ? त्याचे पुढे काय होणार वगैरे ... यातील अनाजीपंत म्हणजे अण्णाजी दत्तो कुलकर्णीच्या मूळ गावाविषयी इतिहासाला फारशी माहिती नाही. तरीपरंतु अनाजी हा साधारणपणे इ. स. 1646 च्या आसपास शहाजीराजेंच्या तालमीत तयार होऊन छ्त्रपती शिवरायांच्या सेवेत दाखल झाला. शिवरायांच्या अनेक मोहिमात त्याने भाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे अफजलखान चालून आला त्यावेळी राजे प्रतापगडाकडे गेले. तेव्हा पाठीमागे जिजाऊ साहेब आणि संभाजी राजे यांच्या देखरेखीसाठी महाराजांनी अनाजीची नेमणूक केली होती , पुढे कोंडाजी फर्जन्दने ज्यावेळी अतिशय कमी सैन्याच्या जोरावर पन्हाळा जिंकून घ्यायचा बेत आखला तेव्हा हाच अनाजी स्वारीच्या पाठीमागची फळी सांभाळत होता. तर छत्रपती शिवाजीराजे शंभूराजासह ज्यावेळी औरंगजेबाच्या भेठीसाठी आग्र्याला गेले तेव्हाही जिजाऊसाहेबांच्या देखरेखीखाली स्वराज्याची जबाबदारी सांभाळण्याचे काम अनाजीने केले. अनाजीला संगमेश्वरचे कु...