कानडी भाषेत वेगवेगळ्या नात्यागोत्यांची नावे काय आहेत
कानडी भाषेत वेगवेगळ्या नात्यागोत्यांची नावे काय आहेत?
- आई - तायी, अम्मा, किंवा अव्वा
- वडील - तंदे किंवा अप्पा
- दादा - अण्णा; वहिनी - अत्तिगे
- ताई - अक्का; भावजी - भावा
- धाकटा भाऊ - तम्मा; धाकटी बहीण - तंगी
- आज्जी - आज्जी; आजोबा - आज्जा/ताता
- मुलगा - मगा; मुलगी - मगळु
- नवरा - गंडा; बायको - हेण्डती, मडदी
- मूल/बाळ - मगु/कंदा/कूसु
- नात - मोम्मगळु; नातू - मोम्मगा
- आत्या/सासू - आत्या/आत्ते
- मामा/सासरे - मामा/मावा
- सून - सोसे; जावई - अळिया
- थोरली काकू/आईपेक्षा थोरली मावशी - दोड्डम्मा, दोडव्वा
- धाकटी काकू/आईपेक्षा लहान मावशी - चिक्कम्मा, चिगव्वा
- थोरले काका - दोड्डप्पा; धाकटे काका - चिक्कप्पा
- नणंद - नादिनी; मेहुणा - मैदुना
- दीर - भावमैदा (बोलीभाषेत बामैदा)
- व्याही - बीगरु
- नातलग - नेंटरु
- मित्र - गेळेया, दोस्त