कदम कुळाचा इतिहास प्रा. डॉ. सतीश कदम ९४२२६५००४४ प्राचीन काळी चेर , चोल , पंडत्र , सातवाहन , वाकाटक , पल्लव , कदंब , चालुक्य , राष्ट्रकूट या बिगज घराण्यांनी राज्यकारभार केला. यातील कदंब घर सुमारे एक हजार कर्नाटक , गोवा आणि ओरिसा याठिकाणी सत्ता गाजवूनही ते इतिहा सात बलिदान राहिले . त्रिलोचनला कदमाचा उल्लेख पुरूष मानला घर. त्यांच्या उत्पत्तीचा संबंध कदंब वृक्षाशी लावला. आपण कदंब कुळ म्हटले. कदंबांची राजकीय कारकीर्द ही इ.स. ३५३ मध्ये वर्माने कर्नाटकात उत्तर मयुर बनवासी या ठिकाणी राज्याची राजधानी होती. पल्लव दरबारात अपमानवादी कदंबाचे स्वतंत्र राज्य निर्माण केले , मयूरवर्मा नंतर सु कंगवर्मा , भगीरथ , रघु , काकुस्थवर्मा , शांतवर्मा , कृष्णवर्मा , कुमारवर्मा यासारखे पराक्रमी राजे राजकारण गेले. या राजांनी हळशी , उच्छंगी या स्वतंत्र राजधान्य तुलनेने बेळगाव , खानापूर , संपगाव , सिरसी , सावनूर , शिमोगा , हुबळी या अधिकारावर राज्य केले. या दरम्यान कदंब कन्नडला प्रथमचा दर्जा दिला. इ. स. ५४३ मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशीने कदंबाचा शेवटचा राजा कृष्णवर...
माने घराण्याचा संक्षिप्त इतिहास प्रा. डॉ. सतीश कदम महाराष्ट्रात जी काही नामांकित लढवय्यी घराणी झाली त्यात माने घराण्याचा समावेश असून राष्ट्रकूटांचे वंशज असणाऱ्या मानेंचे गरुड हे देवक असून माण देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजाला माने हे नाव मिळाले असावे. सिद्धनाथाच्या वास्तव्याने पावन झालेल्या म्हसवड नगरीतून माने घराण्याच्या पराक्रमाला सुरुवात झाली असून बहमनी कालखंडात पाठकोजी हे माने घराण्याचे मूळ पुरुष असून ते देशमुखी वतनदार होते. त्यांचे पुत्र सिदोजी माने हे इब्राहीम आदिलशाहच्या कालखंडात मोठ्या हुद्यावर पोहोचले. सिध्दनाथाला कुलदैवत मानणाऱ्या सिदोजीसोबत नेहमी देवाच्या पादुका आणि बटवा असायचा. सिदोजीला चिलोजी आणि नरसिंहराव ही दोन मुले तर नरसिंहरावाला सिदोजी, चिमोजी, अग्नोजी, खेत्रोजी आणि रथाजी असे पाचपुत्र असून यातील रथाजीची कारकीर्द फारच गाजली. रतोजीला नागोजी नावाचा मुलगा असून मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीच्यावेळी ते मोगलाकडे गेले, तेव्हा औरंगजेबाने त्यांना राजे हा किताब आणि म्हसवड, दहीगाव, अकलूज, भाळवणी, कासेगाव, ब्रम्हपुरी, सांगोले, आटपाडी, नाझरे, वेळापूऱ, कण्हेर, हिंगणी, गरवाद गावच्य...