आयत्या पिठावर रेघा - आंधळी कोशिंबीर

 





याला काही इतिहास नाही

                                                          डॉ. सतीश कदम 


                होळीच्या निमित्ताने असे काही शब्द वाचण्यात आले, ज्याचा लावला जाणारा अर्थ आणि वास्तविक अर्थ यात खूप फरक आहे. ज्याला काही इतिहास नाही, अशाच काही वाक्याचा / शब्दाचा येथे परामर्श घेतलेला आहे.

१. आयत्या पिठावर रेघा - यामध्ये दळणाच्या पिठाचा आणि म्हणीचा अर्थ वेगळाच आहे. त्यानुसार पीठ घेऊन त्यावर रेघा ओढणे हे यात अभिप्रेत नाही. मग हे आले कोठून ? तर पूर्वीच्या काळी प्रमुख अतिथी घरी जेवायला येणार म्हटल्यानंतर त्याची वाट पाहायची. अतिथीला कुठे बसवायचे हे ठरलेले असायचे, परंतु अचानक गोंधळ नको म्हणून जिथं अतिथीचा पाट ठेवलेला असायचा, त्यावर रांगोळीची किंवा पिठाची रेघ मारली जायची. त्यामुळे सहजपणे तो त्या पिठावर बसायचा. साहजिकच विनासायास त्याला आपली जागा मिळायची. खरंतर तो बसल्यामुळे आहे ती रेघ पुसून जायची, परंतु यातून म्हण आली, आयत्या पिठावर रेघा किंवा रेघोट्या, त्यामुळे खाण्याच्या पिठाचा आणि याचा याप्रमाणे आहे.

२. आंधळी कोशिंबीर - यात कोथिंबीर, काकडी, दही वगैरे टाकून केलेला पदार्थ हा अर्थ आजिबात लागत नाही. प्राचीन काळी कौशांबी नावाच्या शहरात " अंधा कौशांबी " नावाचा डोळे बांधून जो  खेळ खेळला जायचा तो खेळ आपल्याकडे आल्यानंतर त्याला ' आंधळी कोशिंबीर ' हे नाव पडले. त्यामुळे खाण्याच्या वस्तूचा यात काही संबंध नाही.

जावई शोध - यातही जावई या नात्याने कुठल्याही व्यक्तीचा काहीही संबंध नाही. तर हा शब्द जाअवेअ - जातवेद्न या शब्दापासून तयार झाला असून याचा अर्थ होतो सर्वकाही जाणतो असा आव आणणारा. विपरीत अर्थाने हा शब्द घेतलेला आहे. कमी माहितीच्या आधारे मत व्यक्त करणारा, त्याच्या अनभिज्ञ उत्तराला जावई शोध हा शब्द रूढ झाला.

बट्याबोळ - मूळ शब्द वास्तुकापूल  ते वस्त्र + ढीग याप्रमाणे असून वस्त्रांच्या दशांची अव्यवस्था किंवा गुंतागुंत असा त्याचा अर्थ होतो. कापड तयार करत असताना कापसाच्या दश्याची गुंतागुंत होणे, म्हणजेच कामाची बिघाड होणे, त्याअर्थाने हा शब्द घेतलेला आहे. याठिकाणी खरंतर कापसाचा संबंध येतो, तो मात्र घेतला जात नाही.

गलतान - गलतान म्हणजेच गलस्तानी, अर्थातच गळ्यावर असलेले, परंतु काय ? तर काही शेळीच्या गळ्यावरही एक दोन स्तन असतात. ज्याचा काहीही उपयोग नाही अशाप्रकारचा अवयव, किंवा निरूपयोगी प्राणी असा होत असलातरी बिघडलेल्या किंवा अनावश्यक कामाला गलतान कारभार असा शब्द रूढ झाला. वास्तविक पाहता या शब्दात कुठेही शेळीचा अथवा स्तनाचा वापर दिसत नाही.

परसांकडे - परसांकडे म्हणजेच परम संकट, आणि दुसरा शब्द परसाकडे, म्हणजेच कुंपणाकडे. या दोन्ही शब्दात  शौचास जाणे हा अर्थ कुठेही अभिप्रेत नाही, तरीपण ग्रामीण भागात आजही शौचास जाणे म्हणजेच परसाकडला जाणे हा शब्द सर्रास वापरला जातो. मात्र पूर्वीच्या काळी शौचासाठी जिथे जायचे तो भाग परसाकडे म्हणजेच गावाबाहेर जाणे या अर्थाने घेतलेला असावा.

झक मारणे - हा शब्द झग या शब्दापासून आलेला असून झक या शब्दाचा मूळ अर्थ होतो, लढण्यास समर्थ असणे. त्यानुसार तो लढण्यास समर्थ होता परंतु लढाईच झाली नाही. म्हणजेच त्याचे एखाद्या कामासाठी सामर्थ्य व्यर्थ जाणे. त्यापासून झक मारली हा शब्द आला.

8. ढालगज – पूर्वीच्याकाळी सैन्याच्या मध्यभागी राजाचे निशाण घेतलेला मुख्य हत्ती असायचा, याच्याच सहाय्याने किल्ला घेण्यासाठी मुख्य दरवाज्यावर धडक मारली जायची. मात्र यासाठी किल्ल्याच्या मुख्य द्वारावर अनकुचीदार खिळे मारलेले असल्याने हत्तीच्या मस्तकावर ढाल बांधलेली असायची. त्यामुळे हत्ती म्हणजे गज आणि त्याच्या मस्तकावरील ढाल या दोन्हीच्या संयोगातून ढालगज हा शब्द आला. मस्तकावर ढाल बांधलेल्या या हत्तीला विविध प्रकाराने बेभान करून किल्याच्या दरवाज्याला जोरदार धडक द्यायला लावायची.  त्यामुळे मदमस्त होवून बेभान वागणार्‍याला ढालगज म्हटले जाऊ लागले. अशाच प्रकारचा पेशव्याचा एक ढालगज हत्ती असून त्याचे नाव भवानी होते. त्याने अनेक वर्षे आपली सेवा बजावली. त्यामुळे पेशवे काळात ढालगज भवानी हा शब्द प्रचलित झाला असावा. त्यातूनच पुढे बेधडकपणे वागणार्‍या स्त्रिला ढालगज भवानी असा शब्दप्रयोग वापरात आला असावा.

9. चोरावर मोर – चउर आणि महुर या दोन शब्दापासून चोरावर मोर हा शब्द बनला. चतुराहून मधुर व्यक्ति श्रेष्ठ असतो. चतुर व्यक्ति श्रेष्ठ असतो परंतु मधुर व्यक्ति त्यापेक्षा इष्ट असतो. त्त्यामुळे या वाक्यात चोराचा किंवा मोराचा येथे काहीही संबंध नाही.

10. गाढव लावणे – या शब्दाचा संबंध थेट इतिहासातील गधेगळ या दगडाशी लावता येईल. त्यानुसार प्राचीन काळात राजाने एखाद्या व्यक्तिला किंवा एखाद्या मंदिराला दान दिल्यानंतर तेथे दानपत्राचा एक भली मोठी शिळा लावली जायची. त्यावर दानपत्राची सविस्तर माहिती दिलेली असायची, ज्यात घेणारा देणारा याचा उल्लेख असून या दगडावर शेवटी एक गाढव स्त्रीसोबत संभोग करताना दाखविलेले असते. याशिवाय या दानपत्रात एक उल्लेख असून यात या दगडाला कोणी मोडेल त्याच्या मायेशी गाढव असे स्पष्ट लिहिलेले असते. त्यावरून गाढव लावणे असा शब्द रूढ झालेला असावा. याशिवाय पूर्वी मातीकाम करण्यासाठी गाढवाचा वापर केला जायचा. अशावेळी त्यात मोठा गैरप्रकार केला जायचा. त्यातूनही गाढव लावणे हा शब्द आला असावा.

11. पुस्तकातील किडा – हा शब्द नेहमी पुस्तकात रमणार्‍याला वापरला जातो. असे असलेतरी पुस्तकाला पोखरणाराही एक किडा असून तो सॉकॉप्टेरा गणात मोडतो. या किटकाच्या अळ्या व प्रौढ पुस्तकातील खळ खावून व पानांना बारीक छिद्रे पाडून पुस्तकाचे नुकसान करतात. त्यालाही पुस्तकातील किडा म्हटले जाते. अशारितीने अनेक शब्दाचा अर्थ माहित करून घेताना  कशाचा अर्थ कशाला लागला हे समजत नाही उदा.  फक्कड - असभ्य, छिचोर, चैनी, नीच कृत्य करणार असा  होतो. छगन - नारदबापू - चातकबालू - गुराखीधारा - रीतभातबावी - भगवती किंवा स्त्रीभोसडा - भसद म्हणजेच पश्चात गुद्द अर्थातच आपनमार्गाने जन्मलेलाबारबोडी - वारवधूक, रांडांचा नायक किंवा नपुसंकदकारटा- १० -१२ च्या भोजनाला गेलेलाकिडा - कीद म्हणजेच ज्ञान किंवा ज्ञाता.. त्यानुसार एखाद्या गोष्टीचे  आघाद ज्ञान असणे, खराब म्हणजे गाढवाचा मूतखातापिता - पोरंबाळं झालेला माणूस याठिकाणी खाण्यापिण्याचा संबंध नाही. ( डॉ. सतीश कदम )

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कदम कुळाचा इतिहास

माने घराण्याचा इतिहास