शिवजन्मपूर्व थोरला दुष्काळ
दै. एकमतमध्ये दर रविवारी जागर स्वराज्याचा ही लेखमाला सुरु झाली आहे.
या थोरल्या दुष्काळाची झळ गोर-गरिबांनाच नाही तर वतनदारांनाही बसली. शिवचरित्र खंड ७ मधील नोंदीनुसार होणाजी निबरे नावाच्या गृहस्थाने आपले घर, भूमी एकूण २५ होणास विकली. यापैकी १९ होण रोख व ६ पायली ज्वारी घेतली म्हणजेच ज्वारीचा भावŸएका पायलीसŸएक सुवर्ण होता तर राजवाडे खंड १८ नुसार निरगुड्याचा पाटील म्हणतो. ‘आपण दुष्काळाकरिता बहुत भोईस पडिलो खावयास काही नाही दुकाळ मोठा काहार पडिला.’
इंग्रजी कागदपत्रानुसार गुजरात ते गोवळकोंडा हा सारा प्रदेश जणू स्मशानभूमीच बनला होता. कन्नडमध्ये याला डेंगी बर्गल म्हटले जाते. डेंगी म्हणजे खोपडी आणि बर्गल म्हणजे दुष्काळ. त्या काळी विजापुरात पाहावे त्या ठिकाणी फक्त कवट्यांचा ढीग दिसत होता.
या दुष्काळामुळे शेती ओस पडली, गावे परगंदा झाली, उद्योगधंदे बुडाले. यातच भर म्हणून की, आदिलशहाचा सेनापती युरार जगदेव याने पुणे शहर जाळून त्यावर गाढवाचा नांगर फिरविला. अर्थकारणासोबतच लोकांची नीतिमत्ताही गहाण पडायला लागली. वतनाच्या तुकड्यासाठी एकमेकांचे मुडदे पाडायलाही वतनदार कमी करीत नव्हते. या भांडणामध्ये नात्यागोत्यांचाही विसर पडायला लागला होता. आपापसांत भांडण लागल्यानंतर ही मंडळी निवाड्यासाठी थेट मुस्लिम राजांकडे जायची !
एकाने वतनाचा फर्मान आणला की, दुस-याने रस्त्यात गाठून त्याचा मुडदा पाडायचा ही नेहमीच बाब होऊ (व्हायला) लागली. अशा प्रकारे जेध्यांनी ज्या वेळी आदिलशाही फर्मान आणल्याचे कळताच खोपड्यांनी त्यांना खिंडीत गाठून मुडदा पाडला. याचा बदला घेण्यासाठी खोपड्याकडील लग्नाच्या व-हाडावर हल्ला करून जेध्यांनी त्यांची सारी बायका-मुले कापून काढली. याच प्रकारे जेधे-बांदल, चोरखे-शिळमकर, पायगुडे-ढमाले यांसारख्या देशमुखांचे वैर जनजाहीर होते.
यापेक्षा वेगळे उदाहरण म्हणजे रंगाजी चटोरेकर यांनी आपल्या मुलीचे लग्न कृष्णाजी देशपांडेसोबत लावून देऊन जावयाला विष पाजवून मारून टाकले. विधवा मुलीमुळे वतन आपल्याकडेच राहील हा हेतू होता. अशा रीतीने दुष्काळामुळे धान्यच नाही तर माणुसकीही महागली होती याचे हे उत्तम उदाहरण होते.
अशा रीतीने १६३० चा थोरला दुष्काळ हा सर्वार्थाने वेगळा होता. महाराष्ट्राची संपूर्ण घडी विस्कटून गेली होती. अशा या अस्थिर अवस्थेतच महाराष्ट्राला नवीन आशेचा किरण दिसला तो म्हणजेच शिवरायांचा जन्म ! भौगोलिक आणि ऐेतिहासिक बदलामुळे बिघडलेल्या समाजाला एका साच्यात आणण्याचे महत्त्वाचे काम करणे हे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. राष्ट्रमाता जिजाबार्इंनी बालशिवबाला घेऊन थोरल्या दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आणि यातूनच महाराष्ट्राची जडणघडण झाली.
शिवजन्मपूर्व थोरला दुष्काळ
देश आणि दुष्काळ या बाबी एकमेकांशी निगडित आहेत. कारण या देशाचा इतिहास पाहिल्यास दर १० ते १५ वर्षांनी मोठे दुष्काळ पडलेले दिसतात. परकीय प्रवाशांनी याबाबतचे वर्णन केल्याने आपणाला भारतातील दुष्काळाची माहिती मिळते. त्यानुसार ‘मध्ययुगीन भारताचा आर्थिक इतिहास’ लिहिणा-या मोर लँड नावाच्या संशोधकाने लिहून ठेवले की, सन १६१४-१५, १६३०, १६३५, १६४१, १६४२, १६४३, १६४५, ४६, १६४७, १६४८, १६५०, १६५८, १६५९, ६० याप्रमाणे लहान-मोठे दुष्काळ पडलेले आहेत.
याप्रमाणे या पाच-पन्नास वर्षांत सर्वांत मोठा दुष्काळ हा शिवजन्मा वेळी म्हणजेच १६३० ला पडलेला होता म्हणून या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हटले गेले आहे. या दुष्काळाविषयी परकीय प्रवाशांनी अतिशय मार्मिकपणे आपले लेखन केले आहे. त्यानुसार डच व्यापारी व्हॅन- ट्विस्ट लिहितो की, ‘पाऊस इतका अल्प पडला की पेरणी केलेले बी तर वाया गेलेच पण गवत सुद्धा उगवले नाही, माणसे शहरे आणि खेडे सोडून निराशेने दाही दिशा भटकू लागली. दुष्काळ पीडितांना ओळखणे सोपे होते. डोळे खोलवर खोबणीत रुतलेले, कातडी टणक बनलेली... जेथे जावे तेथे प्रेताशिवाय काहीच दिसत नव्हते’ .
तर शिवरायांचा समकालीन राजकवि कवींद्र परमानंदाने दुष्काळाविषयी वर्णन करताना लिहिले आहे की, पाऊस न पडल्याने धान्य अत्यंत महाग झाले आणि सोने मात्र स्वस्त झाले. सोने देऊन शेरभर धान्य घेऊ लागले तर गरिबांना काहीच खाण्यास न मिळाल्याने पशू पशूस आणि माणसे माणसांस खाऊ लागली.

संत तुकारामांनीही दुष्काळाविषयी मार्मिक टिपणी केलेली आहे. ते म्हणतात,
बाईल मेली मुक्त जाली ।
देवे माया सोडविला ।।
पोर मेले बरे जाले।
देवे मायाविरहित केले ।।
इंग्रजी कागदपत्रानुसार गुजरात ते गोवळकोंडा हा सारा प्रदेश जणू स्मशानभूमीच बनला होता. कन्नडमध्ये याला डेंगी बर्गल म्हटले जाते. डेंगी म्हणजे खोपडी आणि बर्गल म्हणजे दुष्काळ. त्या काळी विजापुरात पाहावे त्या ठिकाणी फक्त कवट्यांचा ढीग दिसत होता.
या दुष्काळामुळे शेती ओस पडली, गावे परगंदा झाली, उद्योगधंदे बुडाले. यातच भर म्हणून की, आदिलशहाचा सेनापती युरार जगदेव याने पुणे शहर जाळून त्यावर गाढवाचा नांगर फिरविला. अर्थकारणासोबतच लोकांची नीतिमत्ताही गहाण पडायला लागली. वतनाच्या तुकड्यासाठी एकमेकांचे मुडदे पाडायलाही वतनदार कमी करीत नव्हते. या भांडणामध्ये नात्यागोत्यांचाही विसर पडायला लागला होता. आपापसांत भांडण लागल्यानंतर ही मंडळी निवाड्यासाठी थेट मुस्लिम राजांकडे जायची !
एकाने वतनाचा फर्मान आणला की, दुस-याने रस्त्यात गाठून त्याचा मुडदा पाडायचा ही नेहमीच बाब होऊ (व्हायला) लागली. अशा प्रकारे जेध्यांनी ज्या वेळी आदिलशाही फर्मान आणल्याचे कळताच खोपड्यांनी त्यांना खिंडीत गाठून मुडदा पाडला. याचा बदला घेण्यासाठी खोपड्याकडील लग्नाच्या व-हाडावर हल्ला करून जेध्यांनी त्यांची सारी बायका-मुले कापून काढली. याच प्रकारे जेधे-बांदल, चोरखे-शिळमकर, पायगुडे-ढमाले यांसारख्या देशमुखांचे वैर जनजाहीर होते.
यापेक्षा वेगळे उदाहरण म्हणजे रंगाजी चटोरेकर यांनी आपल्या मुलीचे लग्न कृष्णाजी देशपांडेसोबत लावून देऊन जावयाला विष पाजवून मारून टाकले. विधवा मुलीमुळे वतन आपल्याकडेच राहील हा हेतू होता. अशा रीतीने दुष्काळामुळे धान्यच नाही तर माणुसकीही महागली होती याचे हे उत्तम उदाहरण होते.
अशा रीतीने १६३० चा थोरला दुष्काळ हा सर्वार्थाने वेगळा होता. महाराष्ट्राची संपूर्ण घडी विस्कटून गेली होती. अशा या अस्थिर अवस्थेतच महाराष्ट्राला नवीन आशेचा किरण दिसला तो म्हणजेच शिवरायांचा जन्म ! भौगोलिक आणि ऐेतिहासिक बदलामुळे बिघडलेल्या समाजाला एका साच्यात आणण्याचे महत्त्वाचे काम करणे हे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. राष्ट्रमाता जिजाबार्इंनी बालशिवबाला घेऊन थोरल्या दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आणि यातूनच महाराष्ट्राची जडणघडण झाली.
डॉ. सतीश कदम
९४२२६५००४४