bodhalebaba Dhamangaonkar
माणकोजी बोधलेबाबा धामनगावकर
( 1604 ते 1694 )17 व्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेल्या समाजात संतांचे कार्यही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे खुद्द शिवरायांनी अनेक संताना आपल्या गुरुस्थानी मानलेले होते. त्यात संत तुकाराम, रामदास, बोधलेबाबा, अनंतमूर्ती ब्राम्हनालकर , याकुत्बाबा केळशीकर, मौनीबाबा पाटगावकर, शेख महमद यासारख्या संतांचा समावेश होता.
संत माणकोजी बोधालेबाबा हे धामणगाव ता . बार्शी , जि . सोलापूर याठिकांणचे रहिवाशी असून
त्यांच्या वडिलांचे नाव भानजी जगताप असून ते बरीदशाही साम्राजातील देशमुख होते. मानकोजींचे थोरले भाऊ शिवाजी हे नियमितपणे विठठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. परंतु एकदा मानकोजीवर पंढर पुरला जाण्याची वेळ आली. तेव्हा विठ्ठ्लाचे साक्षात दर्शन घेण्याची इच्छया होऊन त्यांनी देवाला साकडे घातले. त्यावेळी
विठ्ठला एकांती बोधिले ।
बोधले नाम तया ।।
तेंव्हापासून जगतापाचे ते बोधले झाले. तेही पुढे देशमुख झाले. त्यांचा विवाह राळेरास येथील निच्चळ घराण्यातील ममताईशी झाला होता. त्यांच्यापासून त्यांना 3 मुले झाली.
1. लखमोजी 2. यमाजी 3. विठोजी .
त्या काळात माणकोजी महाराज हे नामवंत संत असून महाराष्ट्र , गोवा , कर्नाटकापर्यंत त्यांचा महिमा पसरलेला होता. छत्रपती शिवरायाबरोबरच छत्रपती शाहू, माधवराव पेशवे, हिंदुराव घोरपडे यांनी महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानले होते. एवढेच नाहीतर खुद्द बादशाह औरंगजेब बादशाहने त्यांना 1687 साली विजापूरजवळील गलगलीच्या छावणीत पकडून नेले होते. त्यांच्या चमत्कारामुळे बादशाहने त्यांना '' महंता महंत '' हि पदवी व दानपत्र दिले. अब्दुल्ला खान, हसनआलीखान हेही त्यांचे भक्त होते. होते. धामाणगावात त्यांचे भव्य मंदिर असून ते एक जागृत स्थान आहे. भेट दिल्याशिवाय अनुभव येणार नाही. संदर्भ - मराठी रियासत खंड 1, श्री बोधलीलाम्बरी, शिवाजी व शिवकाल
डॉ . सतीश कदम, 09422650044